हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिर्डोशी येथे नीरा देवघर धरणग्रस्तांचे गेल्या सात दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होते परंतु अखेर आठव्या दिवशी भोर वेल्हा मुळशी चे कार्यसम्राट आमदार संग्राम दादा थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन कर्ते यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रधान सचिव असीन गुप्ता ह्यांनी 4 जानेवारी 2023 रोजी बैठकीची वेळ दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी तुर्तास आंदोलन स्थगित केले असून 4 तारखेच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल
धरणग्रस्तांचे विविध प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रलंबित असून हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत लढा चालू राहील असे पुणे जिल्हा विभागीय पुनर्वसन समिती सदस्य संतोष दिघे यांनी सांगितले.





