- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणचांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे रासेयोचे हिवाळी शिबीर सुरु

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे रासेयोचे हिवाळी शिबीर सुरु

- Advertisement -spot_img

शिरुर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या संर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम महत्वाचे असतात अश्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी केले .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या चांदमल ताराचंद बोरा कॉलेज शिरुर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर पानोली येथे सुरु झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे धरमचंद फुलफगर, सरपंच मोहिनी भगत, प्रा संतोष खोडदे, प्रा हरिदास जाधव, प्रा डी के मांडलिक, कार्यक्रम आधिकारी डॉ. ब्रिजेश तांबे, डॉ प्रा .अंबादास केत, प्रा . दिलिप टोणगे आदी उपस्थित होते .

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

मोहिते म्हणाले की नवीन ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रयत्न करावेत. शिक्षण, संशोधन व कौशल्य विकास बरोबर व्यक्तिमत्व विकास महत्वाचा आहे. शिबीर काळात विद्यार्थी गावात सर्व्हे करणार असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ब्रिजेश तांबे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. मंजुषा पाटील यानी केले. तर आभार प्रा. एस. पी कांबळे यांनी मानले .

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page