भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
ग्रामपंचायत वाठार हीमा, ता.भोर या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादीला धक्का देत अपक्ष उमेदवारांनी मारली बाजी. अपक्ष उमेदवार लोकनियुक्त सरपंच सविता खाटपे ६५ मतानी विजयी.
भोर तालुक्यातील वाठार ही. मा. या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस ची एक हाती सत्ता गेली पंधरा वर्ष होती. याचा कार्यकाल संपल्यावर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. या प्रक्रियेत मात्र नेहमीचे चेहरे दिसू लागल्याने वातावरण तापू लागले. या मुळे तरुणा मध्ये नाराजीचे सुर दिसू लागले अन तरुण एकत्र येवून सरपंच अपक्ष उभे राहण्याचे ठरविण्यात आले. राष्ट्रवादीची एक हाती असणारी सत्ता मात्र निवडणुकी नंतर काय असेल याची चर्चा अंतरगत रंगू लागल्या. ठरल्या प्रमाणे सरपंच हा अपक्ष उमेदवार म्हणून बाजी मारणार याची चर्चा रंगू लागल्याने विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकणार यात तीळ मात्र शंका राहिली नाही. तरुणांनी एकजुटीने प्रयंत करून अपक्ष उमेदवार लोकनियुक्त उमेदवार सविता संजय खाटपे ह्या ६५ मताधिक्याने निवडणूक जिकल्या. त्यांना एकूण ३५५ मते मिळाली तर विरोधकास २९० मतांवर समाधान मानावे लागले. या चुरशीच्या लढाई ने तालुक्यात चर्चा जास्त रंगू लागल्या आहेत.

सर्व तरुण कार्यकर्त्या मुळे अपक्ष असून सुध्दा मी निवडणूक जिकले. माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास मात्र गावाच्या विकासातून दाखवू असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच सविता खाटापे यांनी व्यक्त केले. यावेळी एकनाथ खाटपे , दत्तात्रय साळेकर ,विष्णू नाना खाटपे, सचिन खाटपे, सुभाष खाटपे, सुनील साळेकर नामदेव खाटपे, रघुनाथ खाटपे, पंडित खाटपे, बाळा खाटपे, विकास खाटपे, आनंदा खाटपे, सुभाष साळेकर उपस्थित होते.





