- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहिरडोशी येथे चालू असलेल्या आंदोलन कर्त्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

हिरडोशी येथे चालू असलेल्या आंदोलन कर्त्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
                    भोर तालुक्यातील हिरडोशी येथे निरा देवघर धरणग्रस्तांचे बेमुदत धरणे आंदोलन गेल्या पाच दिवसापासून अहोरात्र चालू असून या आंदोलनासाठी मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दिला असून पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांनी देखील पाठिंब्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे.
या आंदोलनकर्त्यांचे १७ वर्षापासूनचे प्रलंबित असलेले विषय लवकरात लवकर मार्गी लागावेत या विषयावर आंदोलन करते ठाम राहिलेले आहेत. त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व आंदोलन करते यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत असताना आज पाचव्या दिवशी स्वतःच्या तोंडाला काळे फासून प्रशासनाचा जाहीर निषेध देखील करण्यात आला असून अजून किती दिवस शासन आमची परीक्षा पाहणार आहे असा खडा सवाल देखील उपस्थित आंदोलन कर्त्यांमध्ये होत आहे.
जर शासनाने लवकरात लवकर दखल घेतली नाही तर या आंदोलनाला एक वेगळेच वळण लागू शकते असे असे आंदोलन करते संतोष दिघे यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये शेकडो आंदोलन करते व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page