दोन्ही पॅनेलला समान जागा देत गावकऱ्यांनी दिला ऐतिहासिक निर्णय
गजानन गव्हाणे पाटील
अत्यंत प्रतिष्ठेची व संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या पूर्व हवेलीतील पेरणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अखेर श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्राम विकास पॅनलच्या उषा दशरथ वाळके या २३६९ मते मिळवत थेट जनतेमधूनसरपंच पदी विराजमान झाल्या. निवडीनंतर पेरणे फाट्यावर गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. पेरणे, ता. हवेली ग्रामपंचायतच्या एकूण १७ सदस्य जागांपैकी ७ जागा श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलला मिळाले असून विरोधी श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनल ७ जागा मिळून पॅनेलचे बलाबल समान झाले आहे तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत.
गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चर्चेत असणारी ग्रामपंचायत निवडणूक निकाला अंती सरपंच पदासाठी ४ उमेदवारांपैकी श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्राम विकास पॅनलच्या उषा दशरथ वाळके यांचा विजय होऊन त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत तसेच इतर सहा वार्डामधील एकूण १७ जागांपैकी दोन्ही पॅनलला ७ – ७ जागा मिळाल्या तर अपक्ष ३ उमेदवार निवडून आले आहेत.

श्री सिद्धेश्वर पाचपिर महाराज ग्रामविकास पॅनेल विजयी उमेदवार असे आहेत प्रभाग क्रमांक १) गणेश येवले (२९९), अश्विनी रुपेश ठोंबरे (२९८), प्रभाग क्रमांक २ अक्षय ज्ञानेश्वर वाळके ( ३६२,), अंकिता सरडे (४१३), शैला ढेरंगे (३४१), प्रभाग क्रमांक ५ सुजय सुदाम वाळके (४३८), अलका मोहन वाळके (५३२) त्याचप्रमाणे श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनल चे विजयी उमेदवार असे आहेत. प्रभाग क्रमांक ३) कल्पना वाळके (५६३), विश्वास वाळके (५५३), सुनील अवचार (६३३), प्रभाग क्रमांक ४) दीपक वाघमारे (६८३), दिनेश वाळके (७३८), मंगल वामने (७१६) अपक्ष विजयी उमेदवार प्रभाग क्रमांक ६ ) अशोक कदम (४३०), सारीका दीपक वाळके (३७९) नंदा ढवळे (३८४), असे आहेत. सरपंच पद थेट जनतेतून निवडले गेले असून उपसरपंच पद पूर्णपणे अपक्ष उमेदवारांवर यांच्या निर्णयावर अवलबून आहे, अपक्ष उमेदवार ज्या बाजूला झुकतील त्या बाजूचा उपसरपंच होईल.





