हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
हिर्डीशी येथे चालू असलेले बेमुदत धरणे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पहावयास मिळाले असून सर्व शेतकरी आपल्या मुद्यावर ठाम आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा चालू असलेले आंदोलन पाहता शासनाने आमची दखल घेतली नसून शासन आमचे मत पाहते की काय अशी चर्चा सुद्धा आंदोलन कर्ते करत आहेत .
आंदोलन ठिकाणी भोर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व हवालदार उद्धव गायकवाड यांनी सुद्धा भेट प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांना कल्पना दिली. आंदोलन कर्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोर पोलीस स्टेशन चे ऐन. व्हि. गोडसे व जि. व्ही.चंदनशिव यांचा दिवस रात्र पहारा चालू आहे. आंदोलनकर्त्यानां हिरडोशीच्या वैद्यकीय अधिकारी अर्चना दरेकर, आरोग्य सेविका प्रमिला सपकाळ, आरोग्य सेवक प्रकाश खंडाईत आशा गट प्रवर्तक सोनाली खाटपे, आशा सेविका रत्ना किंद्रे, सुनीता मांढरे यांनी तपासणी करून औषोधोपचार केले.

या निरा देवघर धरण ग्रस्त आंदोलना मध्ये संतोष दिघे (पुणे जिल्हा विभागीय सदस्य), संजय साने, धोंडिबा मालुसरे, बाळासाहेब मालुसरे, बबन धामूनसे, ज्ञानोबा धामूनसे, दगडू मालुसरे, संतोष चंदर धामूनसे, नामदेव मालुसरे, मारुती धामूनसे, विठ्ठल मालुसरे, संदीप धामूनसे, विठ्ठल मालुसरे, वसंत धामूनसे, सुमल धामूनसे, रुपाली अंकुश धामूनसे, जिजाबाई मालुसरे, गंगाराम धामूनसे, लक्ष्मण धामूनसे, हनुमंत खरुसे आदी धरणग्रस्त आंदोलन कर्त्ये उपस्थित होते.





