सरपंचपदासाठी उषा दशरथ वाळके व सुजाता निलेश वाळके यांच्यात थेट लढत
गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील पेरणे ग्रामपंचायत च्या निवडणुकीच्या प्रचार सायंकाळी बंद करण्यात आला. अखेर पर्यंत उमेदवार प्रत्येक मतदारांशी संपर्क करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असल्याचे चित्र दोन्ही पॅनेलचे व अपक्ष उमेदवार करत होते.
श्री सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या वतीने उषा दशरथ वाळके तर श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनेलकडून सुजाता निलेश वाळके यांच्यात लढत होत असली तरी दोन्ही पॅनेलने या लढतीला प्रतिष्ठतेची केली आहे. त्यातच त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित ! पेरणे गावात ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून अनुभवी व युवा पिढीला राजकारणात उतरविण्यात आल्याने युवा मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी प्रत्येक उमेदवार शर्तीने प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
सरपंच पदाचे उमेदवार
शीतल कैलास कापरे, शांताबाई आनंदा टूले, उषा दशरथ वाळके, सुजाता निलेश वाळके, आशा संतोष सरडे
प्रभाग क्रमांक 1 :- शरद मोहन कोळपे, गणेश हिरामण येवले, अश्विनी रुपेश ठोंबरे, मंगल गुलाब रोकडे
प्रभाग क्रमांक 2 :- सागर नारायण तळेकर, अक्षय ज्ञानेश्वर वाळके, सुरेखा कुंडलिक कापरे, अंकिता हनुमंत सरडे, शैला दत्तात्रय ढेरंगे, नंदा पांडुरंग वाळके
प्रभाग क्रमांक 3 :- रवींद्र किसन वाळके, विश्वास दिलीप वाळके, अनिता रघुनाथ वाळके, कल्पना जगन्नाथ वाळके, सुनील दौलत अवचर, युवराज सत्यवान गायकवाड
प्रभाग क्रमांक 4 :- आदित्य शरद वाघमारे, दीपक सीताराम वाघमारे, रुकसना उस्मान पठाण, मंगल निलेश वामने, प्रसाद महेश गायकवाड,दिनेश जालिंदर वाळके
प्रभाग क्रमांक 5 :- पूनम राहुल गुंडकर, अलका मोहन वाळके, माधुरी नवनाथ वाळके, सुनंदा अशोक गायकवाड, अविनाश बाबुराव वाळके, संतोषराजे महादेव वाळके, सुजय सुदाम वाळके
प्रभाग क्रमांक 6 :- सुमन रतन टूले, नंदा रमेश ढवळे, सारिका दीपक वाळके, साधना राहूल कदम, अशोक रामदास कदम, ज्ञानेश्वर रामभाऊ कदम, सूरज बाळासाहेब वाळके
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆





