भोर/हिरडस मावळ : प्रतिनिधी
निगडे, ता.भोर येथे विजेचा शॉक लागून चारजण जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात असलेली मोटार ढकलत काढत असताना विजेचा शॉक लागून चार जणांचा मृत्यू. भोर तालुक्यातील महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे निष्पाप चार शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.
निगडे, ता.भोर येथे गुंजवणी नीरा नदी पात्रात पाण्यात असलेली मोटार ढकलत बाहेर काढत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे. विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे, ता. भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण, राजगड पोलीस, आरोग्य विभाग दाखल झाले आहे. घटनास्थळी व गावांमध्ये आक्रोश सुरू आहे.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





