भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर तालुकास्तरिय मैदानी स्पर्धेत रायरेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या रावडीच्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयामधील खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले तसेच जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी १८ खेळाडूंची निवड झाली आहे. अशी माहिती भोर तालुका क्रिडा संघटनेचे उपाध्यक्ष. जी. एस. अधिकारी यांनी दिली.
राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत फड़के विद्यालयातील एकूण ३० मुली आणि १६ मुलांनी सहभाग घेतला. सर्व खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी करित विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबर क्रीडा क्षेत्रात ही नावलौकिक होत आहे.

१९ वर्ष वयोगट मुली – खो-खो प्रथम क्रमांक, ४×१०० रिले प्रथम क्रमांक, ४×१०० रिले प्रथम क्रमांक,
१७ वर्षवयोगट मुली-खो-खो द्वितीय क्रमांक, ४×१०० रिले मुली प्रथम क्रमांक, १७ वर्ष वयोगट मुले ४×१००’ प्रथम क्रमांक. १४ वर्ष वयोगट मुली – ४×१०० रिले द्वितीय क्रमांक
१९ वर्ष वयोगट मुली – रिंकू जेधे १०० मी. धावणे द्वितीय, व ३००० मी. धावणे रिले द्वितीय, प्राची धोंडे- २०० मी धावणे प्रथम, निकिता धोंडे ४०० मी.धावणे प्रथम व ८०० मी. धावणे प्रथम, सानिका वाडकर १५०० मी. धावणे द्वितीय, शीतल मोरे थाळीफेक प्रथम
१७ वर्ष वयोगट मुली -श्रावणी पोतदार १०० मी. धावणे तृतीय क्रमांक, प्रांजली शिरगावकर ४०० मी धावणे प्रथम क्रमांक , सायली चिकणे ८०० मी. धावणे द्वितीय व ३००० मी धावणे द्वितीय क्रमांक, संचिता सणस थाळीफेक तृतीय क्रमांक.
१९ वर्ष वयोगट भालाफेक मध्ये समृद्धी कुडापणे प्रथम,
शीतल मोरे द्वितीय क्रमांक.
१७ वर्ष वयोगट ३ कि.मी. चालणे
सृष्टी आंबवले तृतीय क्रमांक
भालाफेक काजल निगडेकर : प्रथम ,सिद्धी धोंडे : द्वितीय
१९ वर्ष वयोगट मुले ५००० कि.मी चालणे
यश धोंडे : द्वितीय ,सुयोग आंबवले : तृतीय
१४ ‘वर्ष वयोगट मुली – समृद्धी चव्हाण ४०० मी. धावणे द्वितीय, कोंढाळकर थाळीफिक प्रथम क्रमांक.
खेळाडूंना क्रिडा शिक्षक अधिकारी जी. एस., हनुमंत कुडपणे, प्रिया वाडकर त्यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल सरस्वती प्रतिष्ठान दधिचिना प्रणाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय जोशी, सचिव श्रीराम जोशी, मुख्याध्यापक मधुमिलिंद मेहेंदळे, रविंद्र पवार व परिसरातील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
मुले ग्रामीण भागातील असो की शहरातील सराव करून ते विद्यार्थी आपले अस्थित्व दाखवितात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते हेच विद्यार्थी चमकल्या शिवाय राहत नाहीत.असे मत जी एस अधिकारी यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना व्यक्त केले.





