- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराजीव केळकर मानवाधिकार पुरस्काराने सन्मानीत

राजीव केळकर मानवाधिकार पुरस्काराने सन्मानीत

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर चे अध्यक्ष राजीव केळकर यांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केळकर यांना पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृती यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय “मानवाधिकार पुरस्कार” मानचिन्ह, सन्मानपत्र, व भारताचे संविधान ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये भोर तालुक्यातील राजीव केळकर यांना गेले अनेक वर्षे भोर तालुक्यामध्ये शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य,शेती या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राजीव केळकर यांची पुरस्कार देवून सन्मानित केले गेले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

मानवी हक्कांबाबत जागृती व्हायला हवी असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. सुधाकरराव जाधव यांनी केले.यावेळी डॉ. सुधाकर जाधवर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ सदस्य न्यायाधीश मंगल कश्यप, पुणे जिल्हा विधिप्राधिकरण शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त नामदेव जाधव, लेखक शार्दुल जाधव, कायदेविषयक सल्लागार समिती ऍड.गायत्री सिंग, ज्येष्ठविधी अड. सचिन झालटे पाटील, कायदेशीर सल्लागार डॉ. यामिनी अडवे, बालहक्क कार्यकर्त्या प्राध्यापक धनंजय लंबाते हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page