हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
आगामी येवू घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका संदर्भात शिवसेना भोर तालुका पश्चिम विभागाचा आढावा बैठक आयोजित केली. त्या वेळी शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विधानपरिदषदेचे आमदार सचिन भाऊ अहिर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा संघटक कुलदीप तात्या कोंडे, भोर विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंदजी हांडे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचीव अविनाश बलकवडे उपस्थित होते.
त्यावेळी सचीन भाऊ अहिर यांनी सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना भोर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या सर्व जागा ताकतीने लढवायच्या आहेत तरी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकार्यांनी तयारीला लागायचे आहे.

यावेळी शिवसेना भोर तालुका प्रमुख हनुमंत कंक, शहर प्रमुख आप्पा सोनावले, महिला आघाडी संघटीका आरती खोपडे, समिर घोडेकर, शैलेश वालगुडे, युवासेना उपजिल्हा अधीकारी दशरथ जाधव, तालुका समन्वयक भरत साळुंके, उपतालुका प्रमुख बाळुमामा वाटकर, विभाग प्रमुख ज्ञानोबा ढमाळ, दशरथ पिलाने, शंकर पडवळ, शैलेश जाधव, संतोष शिवतरे, पंडीत खाटपे, सोपान कंक, आशोक जाधव, विजय शेटे, मयुर म्हस्के व तमाम शिवसैनीक युवासैनीक उपस्थित होते.





