- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिवतांडव वाद्य पथक आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

शिवतांडव वाद्य पथक आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर शहरातील कुंभार टेकडी तालीम मंडळातील तरुण कार्यकर्ते कै. गौरव कुंभार व कै. महेश नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १२० जणांनी रक्तदान करून स्मृतिदिन आदर्श पद्धतीने साजरा करून अनोखी श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास दैनंदिन दुचाकी वरील प्रवासा करिता हेल्मेट मोफत देण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाने मोलाचे सहकार्य करत रक्तपेढी डॉक्टर व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले. शहरातील कुंभार टेकडी तालीम मंडळाच्या परिसरात व महात्मा फुले भाजी मंडई जवळच्या मैदानात सह्याद्री सर्च व रेस्क्यू आणि शिवतांडव वाद्य पथक यांनी संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तालुक्यातील कुंभार टेकडी तालीम मंडळ, आम्ही भोरकर प्रतिष्ठान, भोर तालुका कुंभार समाज, भोर तालुका खाटीक समाज संघटना व तालुक्यातील विविध शिवप्रेमी संघटनांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन यशस्वी योगदान दिले. तरुणांनी रक्तदान करण्यास तयार होऊन गरजूंना मोफत रक्त मिळण्यासाठी मोलाची मदत होईल हा दृष्टिकोन ठेवून तसेच तरुणांनी सुरक्षित प्रवास करावा या हेतूने रक्तदात्यांना मोफत हेल्मेट देऊन अपघात कमी होऊन प्रत्येक जीव वाची काळजी घेणे गरजेचे आहे असे आयोजक प्रशांत कुंभार यांनी सांगितले .

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page