सणसवाडी प्रतिनिधी : प्रमोद कुतवळ
सणसवाडी तालुका शिरूर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सिग्नल बसवण्यात यावे व प्रवेशद्वार व दिशादर्शक फलक आधी गोष्टी करण्याच्या मागणी ग्राहक पंचायतीचे अशोक तुकाराम दरेकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे .
सणसवाडी व परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कंपन्यांची संख्या आहे व औद्योगिकीकरण विस्तार हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी प्रमाणावर वर्दळ निर्माण होत असते कंपनीमध्ये कामासाठी जाणारे कामगार ,शालेय विद्यार्थी,वाहतूक करणारी वाहने आदीमुळे मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम होत असते व यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो म्हणूनच चौकात सिग्नल बसवण्यात यावा तसेच प्रवेशद्वार व नामफलक करण्यात यावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

गावचा नाम फलक नसल्यामुळे नेमके कोणते गाव आहे व कोठे आहे हे समजून येत नसल्यामुळे नाम फलकाची गरज आहे.सणसवाडी कार्यक्षेत्रामध्ये आज पर्यंत लाखो रुपयांची कामे झाली खूप ठिकाणी निधीही टाकला गेला परंतु सिग्नल बसवून चौकामधील दोन डिव्हायडर मधील अंतर हे देखील खूप आहे ते कमी करावे तसेच नाम फलक व प्रवेशद्वार यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब निधी उपलब्ध करून सदर कामे पूर्ण करून घ्यावी अशी मागणी ग्राहक पंचायतीचे अशोक तुकाराम दरेकर यांनी केले आहे





