सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुका जिल्हा क्रीडा स्पर्धेत शासकीय निवासी शाळा दिवे विद्यालयातील चार विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेत निवड झाली असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला डावखर यांनी दिली.
या क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील थाळीफेक मध्ये संविधान तांदळे व कृष्णा माने यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. आदित्य गायकवाड याची १४ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ सर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाने विजयी. तर सिद्धार्थ पाडवी हा विद्यार्थी १७ वर्ष वयोगट तालुका स्तरीय भाला फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या चार ही स्पर्धकांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून ते जिल्ह्यात ही शाळेचे नाव उंचावतील असा विश्वास यावेळी त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांनी व्यक्त केला.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





