- Advertisement -spot_img
HomeUncategorizedगोरड म्हसवली येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

गोरड म्हसवली येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर तालुक्यातील येसाजी कंक जलाशयाच्या काठावर (भाटघर धरण) वसलेल्या गोरड म्हसवली या गावात १९७२ साली प्राणप्रतिष्ठा झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताहचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या सुवर्ण महोत्सवी सप्ताह निमित्त सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सात दिवस दिग्गज किर्तनकारांनी किर्तन सेवा दिली.
या सप्ताहामुळे एकोप्याची भावना जोपासली जावी, संस्कारक्षम पिठी निर्माण व्हावी, धार्मिक विचार नविन पिढीपर्यंत पोहोचून त्यांच्या भविष्यातील जीवनासाठी उपयोगी व्हावे यासाठी या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये वृध्द, महिला व युवक वर्गांनी मोठा सहभाग घेतला होता अशी माहिती युवा सरपंच नथुराम गायकवाड यांनी आपली लोकशाही शी बोलताना दिली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी शांताराम गोरड, सोमनाथ गोरड, अंकुश गोरड, ताराचंद गोरड, अनिल गोरड, अंकुश भडे, भाऊसाहेब गोरड, सर्जेराव गोरड, दिलीप पानसरे, रमेश गायकवाड, मारुती मोरे, अशोक गोरड, शंकर सावंत, नथु गोरड, दत्तात्रय गोरड, दिलीप गोरड, दशरथ गोरड, मुरलीधर गोरड उपस्थित होते. या यशस्वी कार्यक्रमांचे नियोजन ग्रामस्थ मंडळाने केले होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page