गजानन गव्हाणे पाटील
पेरणे फाटा, ता. हवेली येथे गुरुदत्त सेवा संस्थेच्या माध्यमातून श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधा नंतर यंदा निर्बंधमुक्त दत्त जयंती साजरी होत असल्याने हजारो भक्तांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले.

या ठिकाणी 2003 पासून दत्त जयंती मोठ्या उत्साहात एकोप्याने साजरी करण्यात येते. यावेळी मंदिराला फुलांची सजावट करत परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी अभिषेक, भजन तर रात्री दत्त भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वाचे नियोजन व व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी सदस्य मारुती वाळके, संतोष जमादार, कैलास सात्रस, माजी उपसरपंच राजेंद्र वाघमारे, उमेश साडेगावकर, माजी चेअरमन सचिन शिवले, संजय जिद्देवार, तंटामुक्ती चे अध्यक्ष दिनकर गव्हाणे, डॉ. योगेश झुरुंगे, अजिंक्य गव्हाणे, सचिन दरेकर, शरद जमादार, रघुनाथ वाळके, ऋषिकेश रेनाविकर, सुहास धर्माधिकारी, प्रसाद गायकवाड आदींनी केले.






