निघूडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्यात येवू घातलेल्या ५४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रमात गावबैठका होऊन समझोता करीत २४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून ३० ग्रामपंचायतचे मतदान होणार आहे.
तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता. ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. निवडणूक कार्यक्रम लागलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक ही १८ डिसेंबरला होणार आहे तर कांबरे खेबा ग्रामपंचायत साठी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून दोन वार्डामध्ये निवडणूक लागली आहे

बिनविरोध ग्रामपंचायत पुढील प्रमाणे :-
आपटी, बसरापूर, सांगवी, वेखो, साळुंगण, कुंबळे, मळे, वीरवाडी, सोनवडी, म्हसर खुर्द, गुढे, रावडी, भावेखल, हातनोशी, डेहेण, कोंडगाव, भूतोंडे, वाढाणे, खडकी, दुर्गाडी, कोर्ले, पांगारी, नानावाळे, वेळवंड, गृहिणी, करंदी खुर्द, कोळवडी, करंजगाव





