शिरूर : प्रतिनिधी
समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान करुन स्त्री शक्तीचा सन्मान व आदर जिव्हाळा एज्युकेशन ट्रस्टचा वतीने करण्यात आला असल्याचे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिरुर येथे काढले. जिव्हाळा एज्युकेशन ट्रस्ट शिरूर यांच्या वतीने मातोश्री मुळीबाई पन्नालाल बोथरा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ समाजातील गुणवंत महिलांच्या सन्मान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मयूर गार्डन शिरूर येथे करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड. सुधाकर आव्हाड, आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, सतीश सुराणा, शिवसेनेचे अनिल काशीद, रामभाऊ सासवडे आदी यावेळी उपस्थित होते .
जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्या राणी निलेश लंके, पुष्पा राजेंद्र गोखरू, चंद्रकला प्रेमुसुख कटारिया, सुरेखा सतीश सुराणा, उद्योजिका मनीषा कल्पेश दुगड, मंगल विनोद गांधी, पुष्पा नेमीचंद फुलफगर,माजी नगराध्यक्षा उज्ज्वला अभय बरमेचा, मंगला कांतीलाल बोथरा या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान यावेळी करण्यात आला
यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्ती मागे एक स्त्री असते. महिला या विविध क्षेत्रात सक्षमपणे जबाबदाऱ्या पार पाडीत आहे. उद्योग, व्यवसाय, राजकारण सह विविध क्षेत्रात स्त्रीयांनी मोठे यश मिळविले आहे. विविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मान जिव्हाळा ट्रस्टचा वतीने करण्यात आला तो म्हणजे महिला शक्तीचा आदर व सन्मान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्रची सर्वागीण प्रगती व्हावी यासाठी शासन काम करित आहे सव्वा लाखाहून आधीक लोकांना रोजगाराचे ट्रेनिंग सुरु करण्यात आले असून हे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर त्यांना वेगवेगळ्या कंपन्यात नोकऱ्या देण्यात येणार आहे.
समाजामध्ये चांगले राहायच असेल तर कधीना कधी लढा द्यावा लागतो जी लोक लढा जिंकू शकत नाही ती दुसराला बदनाम करतात ही राजकारणातील वस्तूस्थिती आहे. राजकारणाला डर्टी गेम म्हटल जात पण डर्टी गेम म्हणुन तुम्ही कायम राजकारणापासून दूर राहिल्या तर राजकारण कधीही सुधारु शकणार नाही. त्यामुळे चांगल्या लोकांनी राजकारणात गेल पाहीजे. चांगल व लोकहिताचे राजकारण केल पाहीजे असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण संस्था , हॉस्पिटल यासह अन्य माध्यमातून सेवा करु शकता असे ही यावेळी केसरकर म्हणाले.
यावेळी प्रास्ताविक जिव्हाळा एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष कांतीलाल बोथरा यांनी केले. त्यात त्यांनी ट्रस्टचा माध्यमातून राबविण्यात येत असलेले शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. त्याच बरोबर परिसरातील विविध शैक्षणिक प्रश्न शासन दरबारी लावण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
माजी आमदार पोपटराव गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, माजी नगराध्यक्षा उज्जवला बरमेचा आदीची मनोगते यावेळी झाली .
स्वागत व आभार अतुल कांतीलाल बोथरा यांनी केले .
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





