हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुका व शहर अपंग क्रांती संघटनेच्या वतीने भोर मध्ये जागतीक अपंग दिन साजरा करण्यात आला. उत्रौली, ता.भोर येथील योगीराज मंगल कार्यालय येथे अपंग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न तसेच दिव्यांगांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या वतीने नेहमीच सहकार्याची भूमिका राहिल. तसेच दिव्यांग बांधवांनी मतदार नाव नोंदणी करून घ्यावी असे प्रांताधिकारी कचरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी प्रांताधिकारी कचरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भोर नगर पालिका उपनगराध्यक्ष समीर सागळे, नगरसेवक गणेश पवार, प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष मोहिते, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, डॉ.अक्षय वाघमारे, माऊली बदक,सुवर्णा राजीवडे,श्रीराम सिद्धपाठकी,ए ई सी साईबाबा सेवा धामचे प्रशासक अशोक जाधव, यशवंत वाल्हेकर डॉ.शिंदे सुखदेव तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
या अपंग दिनानिमित्त मतिमंद, गतीमंद, मुकबधीर मोफत तपासणी व औषधोपचार शिबीर घेण्यात आले. याचबरोबर भोर महसूल विभागाच्या वतीने दिव्यांगांचे अंत्योदय योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यात आले तसेच एकांत ट्रस्टच्या माध्यमातून मोफत युडीआयडी कार्ड वाटप व अल्पदरात युडीआयडी, आधारकार्ड, पॅन कार्ड,ईश्रम कार्ड रजिस्ट्रेशन करण्यात आले.
या प्रसंगी भोर तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले,शहर अध्यक्ष सतीश शिर्के,महिला अध्यक्षा मनिषा गायकवाड,शहर अध्यक्षा संगिता बहिरट, दत्ता हिंगे, भानुदास दुधाने, विनायक मालुसरे, शांताराम खाटपे, शिवाजी बदक, महेंद्र सोनवणे, बापू धोंडे, नितीन किंद्रे, राजकुमा मोरे, नरेश जगदाळे, सुनिल पळशीकर, अशोक मोरे, दिगंबर चुनाडी, बबन शिंदे, संगिता शिवतरे, शाहिन शेख, सुजाता तनपुरे, सत्वशिला सणस, वर्षा मिंडे, रोहिणी गायकवाड, राणी शिंदे, अश्विनी पांगारकर, राजश्री धावले सह दिव्यांग बांधव व नागरीक उपस्थित होते.

भोर पंचायत समिती येथे अपंग दिन साजरा करताना गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्याहस्ते दिव्यांगांना डायरी आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर तालुक्यातील शाळांमधून अपंग दिन साजरा करण्यात आला.





