प्रतिनिधी : विनायक साबळे
संपूर्ण जिल्ह्यात धडाडीने आपले कर्तव्य जपत अनेक गुन्हेगारांना शासन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व सध्या शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले विकास (आबा) दत्तात्रेय कुंभार यांची कामाची सेवेची दखल घेऊन त्यांची नुकतीच सहाय्यक फौजदार पदावर बढती करण्यात आली.

लोणीकंद पोलीस स्टेशन, शिक्रापूर आणि शिरूर या पोलीस स्टेशनमध्ये गेले 28 वर्षांपासून कुंभार यांनी धडाकेबाज व उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांनी या तीनही पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे उघड करून या गुन्ह्यांचा तपास योग्य दिशेने करून आरोपींना योग्य शासन करणे, गजाआड केले आहे, अनेक महत्त्वाच्या गंभीर गुन्ह्यां मधील तपासामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने उल्लेखनीय काम केले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यास असताना पेरणे फाटा येथील विजय स्तंभावर मागील अनेक वर्षे ते आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी प्रत्येक क्षेत्रातील नागरिक, विविध ठिकाणचे विविध पक्षांचे पदाधिकारी यांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले. तसेच वढू बुद्रुक या ठिकाणी देखील त्यांनी कर्तव्य बजावले आहे.

28 वर्षाच्या कारकीर्दीत पोलीस व सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करताना आरोपींना त्यांची जागा दाखवली. सहाय्यक फौजदार या पदावर नियुक्त करण्यात आले, या बढतीचे पत्र पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले, त्यांच्या या नियुक्ती बद्दल शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व सर्व पोलीस सहकाऱ्यांनी विकास कुंभार यांचा सत्कार केला. कुंभार यांचे या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.





