खेड : प्रतिनिधी
दौंडकरवाडी, ता. खेड येथील जिजाबाई किसन म्हाम्बरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या वय 80 वर्षांच्या होत्या. त्यांचे पाठीमागे पती, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात म्हाम्बरे कुटुंबाचे योगदान मोठे आहे. दौंडकरवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी किसन म्हाम्बरे यांच्या आई तर वढू बुद्रुकचे रमेश भंडारे यांच्या त्या मावस सासू होत्या.






