भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोलावडे, ता.भोर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गजानन महादेव आवाळे तर उपाध्यक्ष पदी जीवन (राहुल) एकनाथ कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भोलावडे ग्रामपंचायची ग्रामसभा सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आवाळे व कुंभार यांची तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. शिक्षण समिती, पञकार, वनविभाग, ग्राम सुरक्षा, कृषी असा २९ समित्यावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सरपंच प्रवीण जगदाळे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच गणेश आवाळे, बंडा तारु, मंगेश आवाळे, शशिकांत जगदाळे, ज्ञानोबा आवाळे, दत्तात्रय आवाळे, माजी उपसरपंच दत्तात्रय जगदाळे, मोहन आवाळे, दिलीप आवाळे, भरत आवाळे, रामचंद्र गावडे, लक्ष्मण भूमकर, साहेबराव आवाळे, अविनाश आवाळे व ग्रामस्थ, तरुण, महिला उपस्थित होते. तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.






