गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विद्यालयाला तालुका पातळीवर तायकांदो स्पर्धेत २ सुवर्णपदक, २ रौप्यपदक व १ कांस्यपदक मिळाले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक कुंभारकर यांनी दिली. शिक्रापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो क्रीडा प्रकारात विद्यालयातील खेळाडूंनी पदके मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुकास्तरावर चमकलेले विद्यालयाचे विद्यार्थी
१४ वर्षाखालील मुली गटात आकांक्षा तांगडे- सुवर्ण पदक
१४ वर्षाखालील मुले गटात सोहम देसाई – सुवर्ण पदक
शिवतेज देसाई – रौप्य पदक
१७ वर्षाखालील मुली गटात
नंदिनी शामबाबू- रौप्य पदक, श्रुती तापकीर – कांस्य पदक

सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक विद्यालयाचे क्रीडा प्रमुख रमेश गावडे तसेच कोल्हे सर, धुमाळे सर, परीट मॅडम, प्राचार्य एम.टी. कुंभारकर, पर्यवेक्षक बेल्हेकर सर यांच्यासह स्पर्धकांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोरेगाव भीमा विद्यालयातील स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रविंद्र फडतरे, उपाध्यक्ष महेश ढेरंगे, सदस्य महादेव फडतरे, कांतीलाल फडतरे, तुळशीदास फडतरे, विजय गव्हाणे, संदिप ढेरंगे, अमोल गव्हाणे, सिराज इनामदार, अशोक घारे, गणेश गव्हाणे, बापूसाहेब शिंदे, अॅड. विकास फडतरे, बबुशा ढेरंगे, उमेश गव्हाणे, दिलीप फडतरे, राहूल फडतरे, अमर फडतरे आदींनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





