महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, पद्माभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ एग्रीकल्चर आंबी यांचा उपक्रम
खेड : प्रतिनिधी
चांदुस, ता. खेड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी मार्फत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषिकन्यांनी नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता व शेतकऱ्यांच्या समस्या ओळखण्यासाठी आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी तसेच कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध योजनांचा अभ्यास केला.
‘ग्रामविकासाठी लोकसहभाग मुल्यावलोकन ‘या कार्यक्रमाचे गावातील ग्रामपंचायत येथे आयोजन करून परिसरात गावाचा नकाशा रांगोळीच्या साहाय्याने रेखाटला. या रांगोळीद्वारे चांदुस गावातील ग्रामपंचायत, शाळा, दूध डेअरी, पाणीपुरवठा केंद्र, विविध सांकेतिक चिन्हे वापरून दर्शविले होते. या माध्यमातून कृषिकन्यांनी चांदुस येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना नकाशा वाचनाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न केला. याद्वारे विद्यार्थ्यांना नकाशा वाचनाचे महत्व पटवून दिले.
या प्रात्यक्षिकाद्वारे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. त्यांनी कृषिकन्यांना अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमासाठी पद्माभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ एग्रीकल्चर आंबी येथील शिक्षक अविनाश खरे यांनी मार्गदर्शन केले. येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सायली विधाटे, वैष्णवी शेळके, स्वरांजली घावटे, संजना शिंदे, अश्विनी तळेकर, दीपिका वखरे, प्रज्ञा कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.





