गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे राज्यशास्त्र विभाग, ग्रंथालय, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला एस एस खर्डेकर इंडस्ट्रीजचे प्रमुख संतोष खर्डेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन व संविधान प्रास्ताविक फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर २६/११ हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सिद्धेश्वर सांगोळे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया व संविधानाचे वेगळेपण विशद केले. महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. ज्योतीराम मोरे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाचे संचालन केले. त्यावेळी डॉ. मोरे यांनी संविधान निर्मितीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खर्डेकर यांनी भारतीय संविधान आणि त्यामुळे भारतीयांच्या जीवनात रुजलेली मूल्ये याचे महत्त्व विशद केले. त्या मुल्यांच्या आधारेच भारतीय व्यक्ती संपूर्ण जगभरामध्ये नावलौकिक मिळवत आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी संविधानामुळे भारताच्या विकासाची व राष्ट्र म्हणून भारत एक परिपूर्ण देश निर्माण होण्याच्या घटीतांबाबतची मांडणी केली व संविधान निर्माण करणाऱ्या संविधान समिती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चक्रधर शेळके यांनी केले. प्रा. निखिल आगळे यांनी अतिशय ओघवत्या वाणीमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताचा गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





