सासवड : प्रतिनिधी
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे, ता. पुरंदर या ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

संविधान प्रतिज्ञा घेत संविधान घोषवाक्य घेण्यात येऊन, दिवे गावातून संविधान जागृती प्रभातफेरी काढत नागरिकांना संविधानाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला डावखर गृहपाल वसंत मोरे, सहाय्यक शिक्षक राठोड, धायगुडे, भोकटे, जाधव, ग्रंथपाल चित्ते आदी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





