- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणदिवंगत फौजदारांची कन्या बनली राज्य विक्रीकर निरीक्षक अधिकारी

दिवंगत फौजदारांची कन्या बनली राज्य विक्रीकर निरीक्षक अधिकारी

- Advertisement -spot_img

सणसवाडी येथील दिवंगत फौजदार पद्माकर हरगुडे यांची कन्या निता हरगुडे हिने केले वडीलांचे स्वप्न साकार
सणसवाडी प्रतिनिधी : प्रमोद कुतवल
सणसवाडी येथील निता पद्माकर हरगुडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत राज्य विक्रीकर निरीक्षक ही पोष्ट मिळवून आपल्या वडीलांचे स्वप्न पुर्ण केले. त्याबद्दल भैरवनाथ मंदिर या ठिकाणी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सणसवाडीचे माझी सरपंच व शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय पठाणराव हरगुडे यांची ती पुतणी आहे.
आपल्या घरातील अधिकारी भाऊ पद्माकर हरगुडे यांचे फौजदार पदावर असताना निधन झाले आणि कुटुंबाला फार मोठा धक्का बसला परंतु त्यातुन सावरत दत्तात्रय हरगुडे यांनी भावाच्या मुलांना अधिकारी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले, खचुन न जाता त्यांनी निता या मुलीला शिक्षण दिले आणि स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिनेही जिद्द मनाशी बाळगून, प्रचंड मेहनत घेऊन लागलेल्या निकालात यशाला गवसणी घातली, एकत्रित कुटुंबातील सर्व सदस्यांनी चुलते बापूसो हरगुडे, विठ्ठल हरगुडे, भाऊ सुनिल हरगुडे व सात भावंडे असा मोठा एकत्रित परिवार आहे. या सर्वांनी वेळोवेळी मदत केली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तिच्या यशाबद्दल शिक्रापुरचे सरपंच रमेश गडदे, राजाभाऊ मांढरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष मनोहर परदेशी सर, काँग्रेस शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव, माझी उपसरपंच सागर दरेकर, अनिल दरेकर, प्रशांत दरेकर, बापूसाहेब दरेकर, संतोष दरेकर, कोंडीबा दरेकर, मा चेअरमन सुहास दरेकर, वकील. गणेश दरेकर, माझी उपसरपंच शिवाजी दरेकर, नवनाथ हरगुडे, गोरख दरेकर, सावता परिषद जिल्हाध्यक्ष गोरख भुजबळ, दिपाली हरगुडे, सुनील हरगुडे, अनिल हरगुडे, राहुल हरगुडे, गणेश हरगुडे, संतोष हरगुडे, सुधीर हरगुडे, रामहरी हरगुडे, अजित हरगुडे, महादेव हरगुडे, ऋतिक हरगुडे, आकाश हरगुडे, अक्षय हरगुडे, यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी निताने माझ्या यशाचे श्रेय माझे कुटुंब, नातेवाईक,आणि माझ्या संपूर्ण गावाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले, समाजाची सेवा,देशाची सेवा प्रामाणिक करण्याचे आश्वासन दिले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page