हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
हिरडस मावळ भागातील मौजे देवघर गावातील आनंदा गेनू कंक यांच्या पाळीव दोन गायी व एका वासरावर सायंकाळच्या वेळेस बिबट्याने हल्ला केला. आनंदा गेनू कंक यांचा मुलगा रोहिदास कंक तसेच गावातील नामदेव किसन कंक हे आपली जनावरे चारण्यासाठी गेले असता अचानक बिबट्याने हल्ला केला. ज्या वेळेस जनावरे बिबट्याच्या तावडीतून सुटून हंबरडा फोडत पळत आली तेव्हा या सर्वांच्या निदर्शनास बिबट्या आढळला व सर्वांनी तेथून जनावरे घेऊन पळ काढला.या बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांना वरखडलेच्या इजा झाल्या आहेत परंतु सुदैवाने कोणतेही जनावर दगावले नाही.
घटनेची माहिती स्थानिकांना समजताच देवघर चे किसन पंडू कंक यांनी वनविभागास कळवले असता वनविभागाचे वनपाल समीर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





