गजानन गव्हाणे पाटील
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत तालुका पातळी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे, ता. शिरुर येथील वेदांत बाबुराव तनपुरे याने लहान गट उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक, ५० मी. धावणे द्वितीय क्रमांक मिळवला तसेच मोठा गट उंच उडी यामध्ये अक्षय प्रकाश जाधव यांने द्वितीय क्रमांक मिळविला. त्याबद्दल त्याचे शाळेच्या वतीने व पंचायत समितीच्या सदस्या अर्चना भोसुरे यांनी शाळेत येऊन वेदांतचा व अक्षय चा सन्मान केला व जिल्हा पातळीवर खेळण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक शंकर शिंदे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते अर्चना भोसुरे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.





