भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
शिक्षणाला जेवढे महत्त्व देतो तसेच खेळला ही महत्व आहे. खेळामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढते तर मानसिकता व एकाग्रता वाढते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा परिषद सातारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये अकरा संघ सहभागी झाले होते. अभिनव इंग्लिश मीडियम संघाने एम इ एस संघ शिरवळ या संघाचा ४६ धावांनी पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्यांचे जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राहुल ननावरे यास सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले या विजया बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, उपाध्यक्ष संजीव जगताप, सेक्रेटरी वैशाली जगताप यांनी विजयी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या धनश्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तर राणी कांटे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.





