-: पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती :-
गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2022 रोजी वाघोली येथील बीजीएस महाविद्यालयात संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाविद्यालयातील स्पर्धकांनी तीन सुवर्ण तर एका रौप्य पदकाची कमाई केली. या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जैन संघटना प्रकल्पाचे प्रमुख सुरेश साळुंखे, छत्रपती पुरस्कार विजेते पद्माकर फड, अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे, प्रभारी प्राचार्य डॉ संजय चाकणे पुणे जिल्हा क्रीडा समितीचे सचिव डॉ सुहास भैरट, स्पर्धा संयोजक डॉ. रमेश गायकवाड, सूर्यकांत दूधभाते व शहा सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील एकूण ३५ महाविद्यालयातील ७५ मुले व ४५ मुली स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. महाविद्यालयाने स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवले. यश गौड, कुणाल मोरे, आकाश मोरे यांनी सुवर्णपदक तर दिव्या चव्हाण यांनी रौप्य पदक पटकवले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संजय गायकवाड, प्रकल्प प्रमुख सुरेश साळुंखे संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.





