हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागातील धानवली ता. भोर येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अथर्व लक्ष्मण धानवले वय -१६ रा.धानवली येथील अल्पवयीन मुलाने गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्हरांड्यातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेची घटना बुधवार दि.२३ पहाटेच्या वेळी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. २३ अल्पवयीन मुलगा पहाटेच्या वेळी घरात नसल्याने मुलाच्या आईने व शेजारील नागरिकांनी मुलाची शोधा शोध सुरू केली असता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानवली ता.भोर येथील शाळेच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्याग्रस्त मुलास उपजिल्हा रुग्णालय भोर येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. पुढील भोर पोलीस करीत आहेत.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





