पुणे प्रतिनिधी : नयना पाचारणे
भेडसगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाजीराव लगारे यांना सेवानिवृत्त आय. ए. एस.अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते “ज्ञान ज्योती” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. वानवडी (पुणे) येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवना मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांचे असलेले योगदान आणि मराठी शाळेचे व पर्यायाने मराठी विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसांन यावर प्रखर भाष्य केले. यावेळी अविष्कार फाउंडेशन चे अध्यक्ष संभाजी पवार व वाडीया कॉलेज चे उपप्राचार्य श्री.चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास आरती लगारे, अशोक कारंडे, लक्ष्मण कारंडे, अनिल सुतार, बाबासो नलगे, संजय कारंडे, प्रकाश पाटील, पंडित पाटील, दादासो शिंदे, प्रमोद चौगुले व इतर मित्र परिवार उपस्थित होता.





