- Advertisement -spot_img
Homeशालेयबीजेएस महाविद्यालयात "साॅप्ट स्कील डेव्हलपमेंट" ट्रेनिंग संपन्न

बीजेएस महाविद्यालयात “साॅप्ट स्कील डेव्हलपमेंट” ट्रेनिंग संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट समिती व प्लेसमेंट सेल यांच्या अंतर्गत तीन दिवसीय सॉफ्ट स्किल (लाईफ स्किल) ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी केले.


या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील बीबीए (सी.ए), बीएससी, बीसीए (सायन्स) विभागातील एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळे करिता प्रमुख पाहुणे रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड मधून अमोल दीक्षित व कांचन औटी सॉफ्ट स्किल प्रोफेशनल ट्रेनर म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांचा संपूर्ण कौशल्य विकास यावर भर देण्यात आला. त्या प्रशिक्षणामार्फत विद्यार्थ्यांना विविध विषयावर ज्ञान अवगत केले संवाद कौशल्य, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पब्लिक स्पिकिंग, ग्रुप डिस्कशन, एम्प्लॉयीबिलिटी स्किल, अशा विविध बाबीवर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास मुलाखत तयारी, संभाषण कौशल्य या विषयाबद्दल सखोल मार्गदर्शन मिळाले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा जोरे हिने केले. व प्रस्ताविक बीबीए (सी.ए) विभागाचे प्राध्यापक हनुमंत जगताप यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्राध्यापक व प्लेसमेंट सेल ऑफिसर दिनेश गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन बीसीए (सायन्स) विभागाच्या प्राध्यापिका सुवर्णा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी बी बी ए(सी.ए) बीसीए विभागातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page