- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणघराला अचानक लागलेल्या आगीत पूर्ण घर संसार उपयोगी वस्तू जळून खाक

घराला अचानक लागलेल्या आगीत पूर्ण घर संसार उपयोगी वस्तू जळून खाक

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर वीसगाव खोऱ्यातील नेरे, ता. भोर येथील रामचंद्र श्रीपती उल्हाळकर यांच्या रहात्या घराला पहाटेची वेळी अचानक लागलेल्या आगीत पूर्ण घर संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. असून आगीचे कारण कळू शकले नाही. नेरे येथील रामचंद्र उल्हाळकर यांचे घर बंद असल्याने जीवित हानी टळली असली तरी घरातील धान्य, कपडे, संसार उपयोगी वस्तू तसेच मिरची कांडप यंत्र आगीत पूणपणे जळून गेले.


पहाटे घराला आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक ग्रामस्थांनी व भोर येथील अग्निशमन दलास पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. तर महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज खंडित केल्याने पुढील धोका अनर्थ टळला. नुकसानग्रस्त रामचंद्र उल्हाळकर यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वीसगाव खोरे परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

    ” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp
मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page