भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
सेवइंडिया असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमात सुवर्णाताई मळेकर पंचायत समिती सदस्य आणि भोर तालुका रोटरी क्लबचे अध्यक्ष यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

आज पर्यंत ग्रामीण भागात केलेल्या समाजकार्याचा योगदानाबद्दल हा समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो. भोर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी।घटकांसाठी तळागाळातील जनता आणि शेतकरी कुटुंबासाठी सामाजिक कार्य केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मळे भूतोंडे भागातील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा ताई संपत मळेकर यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी भारत सरकार प्रोजेक्ट उमेद अभियान च्या संचालिका शिल्पा ब्राह्मणे, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी गवळी साहेब, सेव्ह इंडियाच्या अध्यक्षा श्रद्धा भोर, श्रेयस संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत यांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला.





