- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबीजेएस महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन सदृढ कॅक्टस वनस्पती स्पर्धा संपन्न

बीजेएस महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन सदृढ कॅक्टस वनस्पती स्पर्धा संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जैन संघटनेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथील वनस्पतीशास्त्र विभागात आंतर महाविद्यालयीन सदृढ कॅक्टस वनस्पतीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या महाविद्यालयातून एकूण १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना कॅक्टस प्रजातीतील या काटेरी वनस्पतीचे पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व व मानवी आरोग्यासाठी असलेले स्थान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेे. स्पर्धचे परीक्षक म्हणून महाविद्यालयचे माजी विद्यार्थी व वेदांत ग्रीन्स मल्टीसर्विसेस नर्सरीचे संचालक प्रशांत सोनटक्के तसेच विज्ञान शाखा प्रमुख डॉ. मनीषा बोरा यांनी पाहिले. सदर कार्यक्रमाचे संयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. देविदास पाटील व डॉ. माधुरी पगारिया यांनी केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी कला शाखा प्रमुख डॉ. एस. व्ही. गायकवाड, भूगोल विभाग प्रमुख डॉ. ज्योतीराम मोरे, डॉ. माधुरी देशमुख, प्रा. हनुमान जगताप, प्रा. बंकट कदम, प्रयोगशाळा सहाय्यक भगवान कोपरकर, अमोल केदारी, विलास पाटील, नरेंद्र साळुंखे, हिरामण गावडे, सचिन कुलकर्णी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page