हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील केतकावळे (बालाजी मंदिर) दिवळे हद्दीत केतकावळे येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण भडाळे व बारे खुर्द चे माऊली बदक यांना रस्त्यावर दुर्मिळ “लॉग हेड” जातीचे कासव दिसले असता त्यांनी तात्काळ वनविभाग नसरापूर कार्यालयास फोन करून कल्पना दिली व वनविभागामध्ये दुर्मिळ कासव सुपूर्त देखील केले.
प्राथमिक तपासणीत कासव सुस्थितीत असल्याचे समोर आले असता वनपाल अरुण डाळ यांनी त्या कासवाला त्याच्या अधिवासात सोडणार असल्याचे सांगितले. या दुर्मिळ जातीच्या कासवा बद्दल माउली बदक यांनी माहिती दिली व नंतर वनविभाग नसरापूर चे अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

यावेळी वनपाल अरुण डाळ, वनरक्षक बी. ऐस. तांबे, संध्या कांबळे, लेखपाल लक्ष्मण शिंदे, वनकर्मचारी लक्ष्मण पवार, भोर चे वनरक्षक देठे यांचे विशेष सहकार्य मिळाले असे माऊली बदक यांनी आपली लोकशाहीशी बोलताना सांगितले.





