गजानन गव्हाणे पाटील
” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” च्या जयघोषात भगव्या पताका, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन व हातात टाळ घेत हरिनामाचा गजर करत कार्तिकी एकादशी निमित्त शिरूर हवेली प्रासादिक दिंडी कोरेगांव भिमा ते आळंदी देवाची कडे मार्गस्थ झाली. यावेळी दिंडीचे असंख्य ठिकाणी स्वागत करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून शिरुर हवेली दिंडी पंढरपूर प्रमाणे कार्तिकी एकादशी च्या दिवशी आळंदी या माऊलींच्या दर्शनाला जात असते. यामध्ये गावातील भजनी मंडळे, ग्रामस्थ, महिला युवक उपस्थित होते. दिंडीचे नियोजन करण्यासाठी अशोकराव घावटे, अर्जुन गव्हाणे, दिलीप ढेरंगे, केशव फडतरे, बबनराव गव्हाणे, भाऊसाहेब ढेरंगे आदींनी पुढाकार घेतला.






