- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहिर्डोशी विद्यालयास श्री मार्तंड देवस्थानची मदत

हिर्डोशी विद्यालयास श्री मार्तंड देवस्थानची मदत

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील हिर्डोशी येथील राजगड ज्ञानपीठ संचलित समर्थ रामदास स्वामी विद्यालयास जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त सॉलिसीटर श्री प्रसादजी शिंदे यांच्या प्रयत्नातून विद्यालयातील विध्यार्थ्यांची शालेय फी भरण्यासाठी 50 हजारांचा धनादेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ए. डी. हांडे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला.
हिर्डोशी विद्यालयात वेणुपुरी ते शिळिंब अशा विविध गावातील १८० विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विध्यार्थ्यांच्या शालेय फी साठी मागील वर्षी सुद्धा प्रसादजी शिंदे यांनी ५० हजारांची मदत केली होती. त्याच प्रमाणे याही वर्षी देखील ५० हजारांची मदत केली आहे आणि येथून पुढे सुद्धा काहीही मदत लागली तर अवश्य सांगा मी मदत करण्यासाठी सदैव प्रयत्न करेल असेही शिंदे म्हणाले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या कार्यक्रमा प्रसंगी समाजिक कार्यकर्ते प्रवीण शिंदे.उपसरपंच हनुमंत धामुनसे, बाळासाहेब मालुसरे, धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, दगडू मालुसरे, मारुती मालुसरे, बाळू ढवळे, लक्ष्मण गोरे, श्रीकांत पारठे, आकाश पारठे, सुमित वेणूपुरे, वैभव पारठे, अशोक पारठे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता हांडे, शिक्षक वृंद सुभाष भेलके, एस.आर.डांगे, एम.बी.कुडले, आर. एस. कणसे, एस. आर. बुदगुडे, पी. जे. येलगुडे, आर. टी. पवार, आर. के. तुपे तसेच आदी पालक वर्ग व ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका अनिता हांडे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page