हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर बजरंग आळी येथील राहुल दिघे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. भोर पासून दूरवर डोंगर भागात वसलेल्या पसुरे येथील ग्रामपंचायत कर्मचारी व गरजू व वंचित घटकातील महिलांना सौर कंदील भेट देण्यात आले तसेच भोर मधील वनवासी कल्याण आश्रम मधील अनाथ मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी व शालेय अभ्यासक्रमासाठी उपयुक्त अशी पुस्तके कै. विजय मधुकर दिघे यांच्या स्मरणार्थ भेट देण्यात आली

अभिष्टचिंतन प्रसंगी राहुल शेटे, मनोज धुमाळ, राजू वीर, नवयुग मित्र मंडळ व आझाद मित्र मंडळ कार्यकर्त्यांनी राहुल दिघे यांच्या कार्याचा गौरव करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राहुल दिघे यांच्या जन्मदिन प्रसंगी वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष राहुल शेटे, विजय करंजे, चंदन भावेकर, सोमनाथ शिंगारे, प्रसाद शिवभक्त, मनोज धुमाळ, सागर दिघे, अमजद फरास, किरण शिर्के, राजू वीर, किरण ढवळीकर, रामदास जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज धुमाळ यांनी केले तर आभार डॉ. सागर दिघे यांनी मानले.





