गजानन गव्हाणे पाटील
तळागाळातील ग्रामीण भागातील मुलांना संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज असून भविष्यात सर्वच गोष्टी संगणकावर अवलंबून असल्याने परिसरातील गरजवंत वीस विद्यार्थ्यांना एम. एस. ऑफिस या कॉम्प्युटर कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प ज्ञानशिल्प कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका अनिता शहाजी इंगळे यांनी केला.
वाडे बोल्हाई, ता. हवेली येथील ज्ञानशिल्प कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनिता इंगळे बोलत होत्या. याप्रसंगी जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयास समाज सुधारक व थोर महापुरुषांचे फोटो भेट देण्यात आले.

या वेळी जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य धुमाळ सर, वाडे बोल्हाई चे आदर्श सरपंच दिपक कुशाबा गावडे, वाडे बोल्हाई गावचे पोलिस पाटील सुषमा दर्शन चौधरी पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष शोभा हरगुडे, हवेली तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे, सीता जाधव, माजी सरपंच तुकाराम शिंदे, सामजिक कार्यकर्ता सुखदेव गावडे, उद्योजक राहुल इंगळे. उद्योजक विपुल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते श्रीकांत पाटोळे, अभिजित भोर, शिवाजी भोरडे, ह.भ.प. संजय (महाराज) केसवड, नीलकंठ केसवड, दर्शन चौधरी व सर्व शिक्षक वृद आदी मान्यवरांच्या उपस्थित वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. तसेच इन्स्टिट्यूट चे सर्व विद्यार्थी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याचे कौतुक मान्यवरांच्या वतीने करण्यात आले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





