केंद्रस्तरीय स्पर्धेत कबड्डीमध्ये कंकवाडी (दापकेघर) शाळेतील मुला – मुलींनी मारली बाजी
निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
यशवंतराव चव्हाण कला क्रिडा महोत्सव २०२२ – २३ केंद्रस्तरीय स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साळव, ता. भोर येथे साळव केंद्रातील स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये साळव, रायरी, कंकवाडी (दापकेघर), पत्हर बु., धानवली, रायरेश्वर, धांराबे, रेणुसेवाडी, केशवनगर या शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. या केंद्रस्तरीय स्पर्धांचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताञय साळेकर यांचे हस्ते करण्यात आले.

येथील स्पर्धेत कबड्डीमध्ये कंकवाडी (दापकेघर) शाळेतील मुला – मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला. खो- खो मध्ये मुलांमध्ये कंकवाडीचाच प्रथम क्रमांक आला तर मुलींमध्ये साळव शाळेतील मुलींचा प्रथम क्रमांक आला. लांब उडी धावती लहान गट (मुली) प्रथम क्रमांक -१ली – ५ वी कल्याणी तानाजी जंगम शाळा रायरेश्वर, लांब उडी धावती मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक – ६वी – ८वी मयुरी तानाजी जंगम शाळा रायरेश्वर, लांब उडी धावती लहान गट (मुले) प्रथम क्रमांक -१ली – ५ वी आर्यन रामचंद्र रेणुसे शाळा रायरी, लांब उडी धावती मोठा गट(मुले)प्रथम क्रमांक – ६वी – ८वी साहिल भरत दामगुडे शाळा रायरी. धावणे लहान गट (मुली) प्रथम क्रमांक -१ली – ५ वी समिक्षा रविंन्द साळेकर शाळा साळव, धावणे मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक – ६वी – ८वी दुर्गा रामभाऊ किंन्दे़ शाळा रायरी, धावणे लहान गट (मुले) प्रथम क्रमांक -१ली – ५ वी अजित रविंन्द किंन्दे़ शाळा रायरी, धावणे मोठा गट (मुले) प्रथम क्रमांक – ६वी – ८वी साहिल भरत दामगुडे शाळा रायरी, गोळा फेक मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक – ६वी – ८वी कावेरी केशव कंक शाळा कंकवाडी दापकेघर,गोळा फेक मोठा गट (मुले) प्रथम क्रमांक – ६वी – ८वी प्रतिक पंढरीनाथ साळेकर शाळा साळव, थाळी फेक मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक – ६वी – ८वी कावेरी केशव कंक शाळा कंकवाडी दापकेघर, थाळी फेक मोठा गट (मुले) प्रथम क्रमांक – ६वी – ८वी ओंकार हरिभाऊ साळेकर शाळा साळव, वकृत्व स्पर्धा मुले- मुली मिश्र लहान गट प्रथम क्रमांक – १ली – ५वी साक्षी विलास साळुंखे शाळा रायरी मोठा गट प्रथम क्रमांक – ६वी – ८वी आशा विलास साळुंखे शाळा रायरी, *भजन स्पर्धा* लहान गट प्रथम क्रमांक – १ली -५वी जि.प.प्राथमिक शाळा रायरी ,भजन स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक – ६वी – ८वी जि.प.प्राथमिक शाळा रायरी, *लोकनृत्य स्पर्धा* लहान गट प्रथम क्रमांक – १ली -५वी जि.प.प्राथमिक शाळा रायरी , लोकनृत्य मोठा गट प्रथम क्रमांक – ६वी – ८वी जि. प. प्राथमिक शाळा रायरी, लेझीम स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक – १ली -५वी जि.प.प्राथमिक शाळा साळव, लेझीम मोठा गट प्रथम क्रमांक – ६वी – ८वी जि. प. प्राथमिक शाळा साळव, अशा प्रकारे विविध स्पर्धाचे नियोजन करण्यात आले.

स्पर्धेसाठी साळव केंद्राचे केंद्र प्रमुख सखाराम धोंडिबा बलकावडे, मुख्यध्यापक जयवंत मानसिंग घाडगे, अनंत रामचंद्र आंबवले, मनोजकुमार रघुनाथ पुंरदरे, गायकवाड मँडम, रमेश दगडु शिंदे, विठ्ठल दत्ताञय वरे, हरि शंकर महांगरे, अरविंद लहु शिंदे, दादासाहेब ढमाळे, आशोक दिघे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय साळेकर, संतोष साळेकर, कृष्णाई जनसेवा संस्थेचे अध्यक्ष बाबाजी साळेकर, सोमनाथ साळेकर, समाधान पारठे, रविंन्द किंन्दे़, मंगेश कंक, दत्ता कुंभार, जगन्नाथ साळेकर, हर्षद साळेकर, राहुल जेधे व ग्रामस्थ ,विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती होते. हरि शंकर महांगरे यांनी आभार मानले.





