- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणन्यू इंग्लिश स्कुल, न्हावी येथे विद्यार्थी जागरूकता मार्गदर्शन सत्र

न्यू इंग्लिश स्कुल, न्हावी येथे विद्यार्थी जागरूकता मार्गदर्शन सत्र

- Advertisement -spot_img

पुणे प्रतिनिधी : नयना पाचारणे
न्यू इंग्लिश स्कुल, न्हावी, ता.भोर येथे प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका यांच्या वतीने विद्यार्थी मुला-मुलींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन तसेच सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन सत्र भरविण्यात आले होते. यावेळी राजगड पोलीस स्टेशन महिला हवालदार प्रमिला निकम यांनी मुलींसाठी ‘गुड टच, बॅड टच विषयी माहिती देवून मुलींमध्ये जागरूकता निर्माण केली.
ग्रामीण भागातील मुलां मुलींसाठी हे सत्र आयोजित करून प्रहार जनशक्तीने एक चांगलं कार्य केलं आहे असं निकम यांनी सांगून गावोगावी निर्भया पथक स्थापन झालं पाहिजे तसंच कुठलीही अडचण आल्यास मुलींनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे असंही त्यांनी सांगितले. पालकांनीही आपल्या जबाबदा-या ओळखून मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी न्हावी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण देवडे यांनीही मुलांना तसेच पालकांनाही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मुलींनीही सौ. निकम यांना आपल्या शंका आणि अडचणी सांगून त्यांचे निरसन करून घेतले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर यांनी तर मिलिंद तारू यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सचिन पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष भोर शाखेचे उपाध्यक्ष अजय कांबळे पक्षाचे कार्यकर्ते व अनेक पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page