भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोलावडे, ता. भोर ग्रामपंचायत मध्ये एक दिवसाचे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरवडा अभियानाच्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत गावांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम घेण्यात आली. भोलावडे गावात या मोहिमेचा शुभारंभ ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या मंदिर परिसरापासून स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयपासून गावठाण, हरिजन वस्ती, जिल्हा परिषद शाळा परिसरात स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता अभियानामध्ये तरुणांची संख्या मोठी होती. स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन स्वतः तरुणांनी हातात झाडू घेतला. संपूर्ण रस्ते, गटारे परिसर स्वच्छ करून इतरांनाही स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. आपल्या गावातील परिसर स्वच्छ केल्याने साथीच्या आजारापासून आपली सुटका होऊ शकते. रस्त्याने जाताना येणारी दुर्गंधी पासून सुटका झाल्याने ग्रामस्थ आनंदी होते.

ग्रामपंचायत सदस्यांनी मोठ्या उत्साहात स्वच्छतेचे महत्व आपल्या कृतीतून ग्रामस्थांना दाखवून दिले . याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रवीण जगदाळे, उपसरपंच गणेश आवाळे, शशिकांत जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पडवळ, बंडा तारू, मनोज मोरे, अविनाश आवळे, ग्रामसेवक निळकंठ निकाळजे, सुनील चोरगे, मंगेश आवळे, नरेंद्र जगदाळे, दत्ता अबदागिरे, धनंजय आवळे, रवींद्र जगदाळे, दिलीप आवळे, नामदेव गुरव, समीर घोडेकर, मयूर मस्के, बबन आवळे, दत्ता आवळे, किरण कांबळे, निलेश गावडे, रणजीत रणखांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
गाव स्वच्छ केल्याने गावचे रूप पलटते या कृतीतून नागरिकांना याची जाणीव झाली.आपला परिसर स्वच्छ ठेवल्याने इतर रोगापासून आपली मुक्तता होते परिसरातील नागरिकांना जाणीव करून दिली.असे मत आपली लोकशाही शी बोलताना सरपंच प्रवीण जगदाळे यांनी व्यक्त केले.





