भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
मळे ते आळंदी पायीवरी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना रोटरी क्लब ऑफ भोर राजगडच्या वतीने औषधाचे किट वाटप व धनुर्वाताचे लसीकरण करण्यात आले. मळे ते आळंदी देवाची पायी वारकरी दिंडी सोहळ्यातील वारकरी यांना मौजे म्हसवली- गणेशनगर या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ भोर राजगडच्या वतीने एकूण १५० वारकऱ्यांना धनुर्वात लसीकरण सर्दी- खोकला, थंडी -ताप, जुलाब -उलट्या सारख्या सर्वसामान्य आजारांवर गोळ्या औषधे आणि औषधांचे किट देण्यात आले. कै. वसंतदादा गोरड वाचनालयासाठी पुस्तके आणि वारकऱ्यांसाठी ग्रंथ वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुवर्णाताई मळेकर, ह. भ. प. कीर्तनकार सुनील महाराज राजीवडे, सणसमहाराज, दिंडी चालक बाबाजी वरखडे महाराज (करंदी ) यांच्या हस्ते वाचनालयाचे संस्थापक सुनील वसंत गोरड यांच्याकडे पुस्तक संच देण्यात आला.
पायी वारी करत असताना औषधांच्या माध्यमातून प्रथमोपचार मिळावा तसेच ग्रामीण भागातील शेतकरी वारकरी शेतीची कामे करत असताना अनेकदा लोखंडी हत्यारांनी जखम होतात. शेतीच्या कामातून वेळ मिळत नाही याचा त्रास होऊ नये व वारी सुखरूप व्हावी या करिता धनुर्वाताचे लसीकरण रोटरी क्लब ऑफ भोर यांच्या वतीने करण्यात आले.

प्रास्ताविक सुनील गोरड यांनी केले. यावेळी रोटेरियन डॉ. आनंदा कंक, डॉ. संजय म्हेत्रे, डॉ. बालाजी काटे, दत्ता काळू गायकवाड, नथू काळू गायकवाड, रोटेरियन संपत मळेकर, मारुती राठवडे (मळे), महादेव कोळी संघटनेचे अध्यक्ष जाणबा कोंडीबा गायकवाड, नाना विठ्ठल कडू, बाजीराव गायकवाड, बालाजी तेलंग, विलास गायकवाड तसेच मळे, कुरुंजी, कांबरे, करंदी गावातील वारकरी, म्हसवली गणेशवाडी तरुण मंडळ, ग्रामस्थ, महिला भगिनी, सहभागी झाल्या होत्या. गणेश तरुण मंडळाच्या वतीने निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.





