- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभोर मध्ये विशेष विध्यार्थ्यांसोबत लेकीचा वाढदिवस साजरा

भोर मध्ये विशेष विध्यार्थ्यांसोबत लेकीचा वाढदिवस साजरा

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून भोर तालुक्यातील बारे खुर्द गावातील माऊली बदक यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस मनाने श्रीमंत असलेल्या मुक बधीर शाळेत साजरा केला. वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात, गरीब असो वा श्रीमंत काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात. माऊली बदक यांनी वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टी न देता गोर गरीब निराधार अनाथ मुलांसाठी फळे वाटप आणी अल्पोहार व्यवस्था केली व अन्नदान केले.
माऊली बदक यांच्या बरोबर अखिल मराठा महासंघ भोर तालुका महिला अध्यक्ष सीमा ताई तनपुरे, तालुका अध्यक्ष सुशांत तनपुरे, युवक अध्यक्ष प्रशांत पडवळ, भोरकर प्रतिष्ठान अध्यक्ष समीर घोडेकर, खजिनदार मंगेश आवाळे, मयूर म्हस्के, श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठान तुषार भाऊ साळेकर, जनकल्याण समिती भोर तालुका हेमंत बोडके, अभिजित फडतरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे आहे असा विचार साधारणपणे करण्यात येतो, अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो. सगळे करतात म्हणून आपणही चुकीच्या गोष्टी करणे योग्य नाही, म्हणून मी व माझा मित्र परिवार असे सामाजिक कार्य करुन वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे, असे माऊली बदक यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page