गजानन गव्हाणे पाटील
संपूर्ण राज्यात नावलौकिक असलेल्या तसेच सत्तारूढ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलच्या तब्बल 20 जागा मिळवीत पुन्हा एकदा मतदारांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवडणुकीत एकमेव बिनविरोध निवड झालेल्या तसेच युवा संचालक ऋषिराज अशोक (बाप्पू) पवार तर व्हॉइस चेअरमनपदी पोपटराव रामदास भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शिरूर तालुक्यातील सर्वाधिक उसाचे गाळप करणाऱ्या कारखाना असा नावलौकिक घोडगंगा कारखान्याचा आहे. शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांचे वडील रावसाहेब दादा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला असून, तालुक्यातून सुमारे 18000 शेतकरी सभासद आहेत. पूर्वीपासून आमदार पवार यांची सत्ता आहे, नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 21 जागांपैकी 20 जागा जिंकून शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आमदार पवार यांनी विरोधकांना धूळ चारली, विरोधकांना फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस बागायत क्षेत्र असून घोडगंगा सहकारी साखर कारखाना ही शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची सहकारी संस्था आहे, या संस्थेवर राष्ट्रवादी पुरस्कृत शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली, तालुक्यातील त्यांचे सहकारी, नियोजन समितीचे पंडित आप्पा दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेंद्र नरवडे, प्रकाश पवार, सभापती मोनिकाताई हरगुडे इतर अनेक पदाधिकारी यांच्या नियोजनातून निवडणुकीत एक हाती सत्ता आली आहे. नवनिर्वाचित चेअरमन ऋषीराज पवार व व्हा. चेअरमन पोपटराव भुजबळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





