गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली व ज्युनिअर तसेच युथ रेड क्रॉस समिती (इंडियन रेड क्रॉस) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमोपचार ट्रेनिंग या एक दिवशीय कार्यशाळेची उद्घाटन डॉ. राजकुमार शहा संचालक प्रथमोपचार ट्रेनिंग इंडियन रेड क्रॉस समिती यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवावर प्रथमोपचार कसे करायचे त्याचे मॉडेलवर प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करावयास सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय रेड क्रॉस समितीचे प्रमुख डॉ. माधुरी देशमुख व डॉ. बंकट कदम यांनी केले.

या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी भारतीय जैन संघटनेचे व महाविद्यालयाचे 1993 पासूनचे आपत्ती व्यवस्थापनाचे व आरोग्य विषयाची माहिती दिली व विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे महत्त्व सांगितले. या कार्यशाळेत एकूण 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेची सूत्रसंचालन प्रा. सांगोळे यांनी केले.





