- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणज्ञानेश्वर सेवा वारकरी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान

ज्ञानेश्वर सेवा वारकरी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
खानापूर, ता.भोर येथील ज्ञानेश्वर सेवा वारकरी दिंडीचे चालक ह. भ. प. धोंडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली कार्तिकी एकादशी निमित्ताने होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यासाठी या पायी दिंडीचे भोर मधून भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत टाळ मृदंगाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भोर येथील चौपाटी येथे राजगड ज्ञानपीठाचे मानद सचिव स्वरुपा थोपटे यांनी पालखीचे पूजन करुन दर्शन घेतले. दिंडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या गितांंजली आंबवले, राजगड ज्ञानपीठ विश्वस्त पंढरीनाथ भिलारे, ज्ञानोबा रवळेकर, एकनाथ धावले, रामदास कुंभार, गणेश पवार, जिजाबाई उल्हाळकर सह मान्यवर, भाविक व वारकरी उपस्थित होते. याच बरोबर कोकणातून वरंधा घाटातून हिर्डोशी मार्गे भोर हून आळंदीकडे अनेक पायी वारींचे प्रस्थान होत असते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page